esakal | कुठे कमी तर कुठे धो धो मराठवाड्यात १७ मंडळात अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

कुठे कमी तर कुठे धो धो मराठवाड्यात १७ मंडळात अतिवृष्टी

गुरुवारी रात्री मराठवाड्यातील १७ मंडळात अतिवृष्टी झाली. शुक्रवार (ता.१२) सकाळ पर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सरासरी १९.८५ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ३७.८६ मिलीमीटर औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ७.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

कुठे कमी तर कुठे धो धो मराठवाड्यात १७ मंडळात अतिवृष्टी

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबादः मृग नक्षात्रात मराठवाड्यातील अनेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावेली आहे. गुरुवारी रात्री मराठवाड्यातील १७ मंडळात अतिवृष्टी झाली. शुक्रवार (ता.१२) सकाळ पर्यंत आठ जिल्ह्यात सरासरी १९.८५ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ३७.८६ मिलीमीटर औरंगाबाद तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ७.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात असा झाला पाऊस

मराठवाड्यात सुरवातीलच मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांची लगबग सुरु आहे. बुधवार आणि गुरुवारी अनेक तालुक्यांमध्ये पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याने शुक्रवार (ता.१२) सकाळपर्यंत ३७.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, बिडकीन, नांदर, अंभई, भराडी, गोळेगाव, बोरगाव, सोयगाव, बनोटी अशा ९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील राजुर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ३८.२० मिलीमीटर पाऊस झाला. तर परतुर तालुक्यात पाऊस झालाच नाही. गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्यात फक्त ७.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक १४.६७ मिलीमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात १९.८९ मिलीमीटर पाऊस झाला. यात सेनगाव तालुक्यातील साखरा, पानकनेरगाव या दोन मंडळात अतिवृष्टी झाली. सेनगाव तालुक्यात  ४५ मिलीमीटर पाऊस झाला.

हेही वाचा- उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

नांदेड जिल्ह्यात २३.५३ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात ही पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात १४.३१ मिलीमीटर पाऊस झाला. केज तालुक्यातील होळ मंडळात अतिवृष्टी झाली.

लातुर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपुर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. उदगीर, किनगाव, हाडोळती, अंधोरी या चार मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यात १३.१९ मिलीमीटर पाऊस झाला. कळंब तालुक्यात सर्वाधिक ४१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

loading image