esakal | उस्मानाबाद : दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, या तीन तालुक्यातील नद्या, नाले तुडूंब
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad nadi nale.jpg

बुधवारी रात्री जिल्ह्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा पावसाने जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे या भागांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पाऊस झाला नव्हता. अशा महसूल मंडळात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कळंब तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस झाला आहे.

उस्मानाबाद : दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, या तीन तालुक्यातील नद्या, नाले तुडूंब

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद  :  सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री पावसाने जिल्ह्यतील तीन तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. कळंब, वाशी आणि भूम तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. 

लॉकडाउनचे मानगुटी भूत, पुन्हा अफवांना ऊत!   

बुधवारी रात्री जिल्ह्याच्या सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा पावसाने जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे या भागांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पाऊस झाला नव्हता. अशा महसूल मंडळात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कळंब तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस झाला आहे.

औरंगांबादेतील बहीण-भावाच्या हत्याकांडामागे ओळखीचेच ?  

तालुक्यातील कळंब महसूल मंडळात ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शिराढोन १९, ईटकुर ४३, येरमळा ४१, मोहा ४७ आणि गोविंदपुर ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. 

शेतातील ताली, बांध पूर्णपणे पाण्याने भरले आहेत. दोन दिवस झालेल्या पावसाने पेरणीयोग्य पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसाने उघडीप देताच पेरणीला सुरुवात करणार असल्याचं शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे बियाणी, खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. वाशी तालुक्यात ही  सरासरी ३४ मिलीमटर पाऊस झाला आहे. यामध्ये वाशी महसूल मंडळात ३२ मीलीमीटर तर तेरखेडा येथे हे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेरखेडा येथून तेरणा नदीचा उगम होतो. त्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तेरणा नदीही भरून वाहू लागली आहे. 

महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध  

नदीवरील अनेक बंधारे तुडुंब भरले आहेत. बुधवारी रात्री भूम तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र आंबी महसूल मंडळात पावसाने अगदीच थोडी हजेरी लावली होती. मात्र या भागात गुरुवारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. ४५ मिलिमीटर पावसाची नोंद आंबी महसूल मंडळात झाली आहे. त्यामुळे आता तालुक्याच्या सर्व महसूल मंडळात समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बहुतांश महसूल मंडळात काल तुरळक पाऊस झाला. मात्र उस्मानाबाद ग्रामीण महसूल मंडळात पावसाने चांगलीच हजेरी लावली. सुमारे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद या महसूल मंडळ झाली आहे. 

अन्यथा औरंगाबाद शहरात असते सात हजार रुग्ण 

लोहारा निरंक इतर तालुक्यात शिडकावा
 लोहारा तालुक्यात मात्र गुरुवारी पाऊस झाला नाही. एकाही मंडळात पावसाने हजेरी लावली नाही. उमरगा तुळजापूर या दोन्ही तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस झाला तर अनेक महसूल मंडळात पाऊस झालाच नाही.

loading image
go to top