esakal | औरंगाबाद शहरात एकीकडे हलक्या सरी, दुसरीकडे कोरडेठाक
sakal

बोलून बातमी शोधा

rain

औरंगाबाद शहरात एकीकडे हलक्या सरी, दुसरीकडे कोरडेठाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: पंधरा ते वीस दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी (ता. आठ) सायंकाळी हजेरी लावली खरी पण अर्ध्या शहरातच. अर्धे शहर कोरडेठाक होते. सिडको-हडको भागात सायंकाळी झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले पण जुन्या शहरात फक्त रस्ते ओले झाले. हवामान विभागाने राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होत असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, आज झालेल्या पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. चिकलठाणा येथील वेधशाळेत या पावसाची १.६ मिलिमिटर एवढी नोंद झाली.

शहरासह जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली आहे. रोहिणी नक्षत्राचा पाऊस जोरदार बरसला होता. मृग नक्षत्राने मात्र फटका दिला. सोमवारपासून (ता. पाच) पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. तेव्हापासून वातावरणात बदल झाला असून, दिवसभर उन्हाचा उकाडा वाढला आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत आकाशात ढग दिसून येत आहेत. त्यात दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात गुरुवारी सायंकाळी शहरालगतच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली.

सिडको-हडको, मुकुंदवाडी, गारखेडा परिसर, चिकलठाणा तसेच माळीवाडा, शरणापूर, अप्पावाडी, मिटमिटा, पडेगाव, तिसगाव परिसर, छावणी, सातारा परिसर, हर्सूल, नारेगाव भागात पावसाने हजेरी लावली. पण जुन्या शहरात पाऊस नव्हता. काही ठिकाणी रस्ते ओले होतील, एवढाच तुरळक पाऊस पडला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत १.६ एवढी नोंद झाली आहे.

loading image