esakal | पाणी योजनेच्या कामांना पावसाचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

aurngabad

पाणी योजनेच्या कामांना पावसाचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होऊन दहा महिने झाले आहेत. मात्र, सुरुवातीला कोरोनासंसर्ग व आता पावसाचा अडथळा या योजनेला आला आहे. वारंवार मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा परिणाम कॉंक्रिटीकरणाच्या कामावर होऊ शकतो, असे सांगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सध्या काम थांबविण्याची सूचना कंत्राटदाराला केली आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा नारळ डिसेंबर महिन्यात फोडण्यात आला होता. शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. असे असले तरी सुरुवातीला कोरोना संसर्गामुळे व आता पावसामुळे पाणी पुरवठा योजनेच्या कामांना ब्रेक मिळाला आहे. योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीने शहरात ४९ पाण्याच्या टाक्यांपैकी १५ टाक्यांचे काम सुरू केले होते. तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, तिथे पाइपलाइन टाकली जात आहे.

त्यासोबतच नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण व साठवण टाक्यांची कामे सुरू करण्यात आली होती. पण या कामांना पावसाचा फटका बसला आहे. महिनाभरापासून पावसामुळे बहुतांश कामे बंद आहेत. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पावसात कामे करू नका, अशा सूचना कंपनीला दिल्या आहेत. महिनाभर काम बंद पडले असले तरी आता पावसाळा संपत आल्याने कामांना गती मिळेल, असे जीवन प्राधिकारणचे अधीक्षक अभियंता अजयसिंह यांनी सांगितले.

loading image
go to top