esakal | शिवजयंती ३६५ दिवस व्हावी, आम्ही तिथीनुसारच करु - राज ठाकरे 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये सण साजरे करतो, आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणपती तारखेनुसार साजरे करत नाही. त्यामुळे आजचा दिवस म्हणजेच महाराजांची जयंती हा सण तिथीनुसारच झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती महोत्सव होतोय.

शिवजयंती ३६५ दिवस व्हावी, आम्ही तिथीनुसारच करु - राज ठाकरे 

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : मला अनेकांनी विचारले कि, तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची का तारखेनुसार? मी म्हटले खरंतर ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी किंवा गणपती हे सण आपण तारखेनुसार साजरे करत नाही. त्यामुळे महाराजांची जयंती हादेखील सण असून तो तिथीनुसारच साजरा झाला पाहिजे. असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 

क्रांती चौकात मनसेतर्फे गुरुवारी (ता. १२) दुपारी बारा वाजता शिवपुजन करुन तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिक हजर होते. ‘‘मी एके दिवशी कालनिर्णयचे जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो. साधारणपणे पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल. जयंतराव तुमचं काय मत आहे, शिवजयंती तारखेनुसार करायची की तिथीनुसार? ते म्हणाले, ३६५ दिवस करायची.’’ 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

‘‘आपण वर्षभर हिंदू धर्मामध्ये सण साजरे करतो, आपण दिवाळी तारखेनुसार साजरी करत नाही. गणपती तारखेनुसार साजरे करत नाही. त्यामुळे आजचा दिवस म्हणजेच महाराजांची जयंती हा सण तिथीनुसारच झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा शिवजयंती महोत्सव होतोय.’’ असेही ठाकरे म्हणाले. 

कोरोना व्हायरसमुळे कसे करायचे? असे काहीजण विचारत होते. मी म्हटले, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्याच्यात आणखी एक आजार वाढला, काय फरक पडतो? असे असले तरी, तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अशा कुठल्याही गोष्टीची लागण महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. पण हा उत्सव तुम्ही दिमाखात साजरा करा. शोभायात्रा तिथीनुसार पार पडेल, त्याला गालबोट न लागणार नाही. याचीही काळजी घ्या. असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

क्रांती चौकात शिवपूजन दहा वाजता होणार होते मात्र, राज ठाकरे दोन तास उशिरा आले. शिवजयंतीसाठी लेझीम, मलखांब, मर्दानी खेळ यासाठी शाळेचे विद्यार्थी आले होते. शहरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा मनसेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. सिडको ते क्रांती चौकादरम्यान वाहन रॅली काढण्यात आली. नाशिकचे ढोल, छावणीचे वाद्यपथक, महापालिका शाळा, खासगी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 

यांची उपस्थिती

मनसे नेते अभिजीत पानसे, जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, सुमित खांबेकर यांच्यासह प्रकाश महाजन, दिलीप बनकर, मनसे संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर, संदीप कुलकर्णी, आशिष सुरडकर, अमित भांगे, चेतन पाटील, राहुल पाटील, संकेत शेटे, योगेश शहाणे आदींची उपस्थिती होती.

loading image