esakal | Shivjayanti 2020 : छत्रपती शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके संपली, मागणी प्रचंड
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

छत्रपती शिवाजी महाराजांवर उर्दूतून दोन पुस्तके आहेत. या दोन्ही पुस्तकांना उर्दूतील वाचकांची प्रचंड मागणी असून विक्रेत्यांकडील जवळपास सर्वच पुस्तके संपली आहेत.

Shivjayanti 2020 : छत्रपती शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके संपली, मागणी प्रचंड

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : राज्यात आणि औरंगाबाद शहरात उर्दू वाचकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, महापुरुषांविषयी मराठीतून उर्दू अनुवादित होणाऱ्या पुस्तकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर उर्दूतून दोन पुस्तके आहेत. या दोन्ही पुस्तकांना उर्दूतील वाचकांची प्रचंड मागणी असून विक्रेत्यांकडील जवळपास सर्वच पुस्तके संपली आहेत.

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा  

छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी भाषेतून विपुल प्रमाणात लिखाण आहे. हे लिखाण उर्दू भाषिकांना कळावे यासाठी काही जणांनी प्रयत्न केले. त्यात कॉ. गोविंद पानसरे यांचे "शिवाजी कोण होता?" हे मराठीतील पुस्तक सय्यद शाह गाजियोद्दीन यांनी उर्दूत भाषांतरित केले. त्यांनी अनुवादित केलेले 'शिवाजी कौन थे?' या पुस्तकाला सध्या प्रचंड प्रमाणात मागणी असून या पुस्तकाच्या आतापर्यंत हजारो प्रती विक्री झाल्या आहेत. विक्रेत्यांकडे सध्या उर्दूतील या पुस्तकाच्या प्रतीच शिल्लक नाहीत. अजूनही या पुस्तकाची वाचकांकडून मागणी केली जात आहे.

घाटी रुग्णालयात मोठा फ्रॉड - वाचा 

यासोबतच "शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपेहसालार" हे पुस्तक मराठीतून सय्यद शाह वायेझ यांनी उर्दूत भाषांतरित केले आहे. या पुस्तकाच्या आतापर्यंत पाच आवृत्त्या संपल्या आहेत. अजूनही या पुस्तकाला वाचकांची मागणी आहे. तसेच मुजाहिद शेख यांनी मराठीतून "शिवचरित्र एक मुसलमानी आकलन' हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे निवडक मुस्लिम सैन्य, शिवाजी महाराजांचे लोकशाहीवादी शासन असे मुद्दे यात आहे.

उर्दूतील पुस्तकांची संख्या वाढावी

मिर्झा अब्दुल कय्युम नदवी (मिर्झा वर्ल्डबुक) : महापुरुषांची माहिती होण्यासाठी मराठीतील पुस्तकांचे उर्दू भाषेत अनुवाद झाले पाहिजे. राज्य शासनातर्फे १९८०च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांवर उर्दूतून पुस्तक आले होते. हे पुस्तक सुद्धा पुनर्मुद्रित होऊ शकते. तसेच शिवाजी महाराजांवरील इतर पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने उर्दूतून अनुवादित झाली पाहिजे; मात्र यामध्ये आर्थिक अडचणी येतात. तरीही पुस्तके अनुवादित करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

पुलाची सेंट्रिंग कोसळली, लोखंडी सळ्या पडून पाच मजूर दबले

go to top