Raksha Bandhan 2022 : टपाल विभागातर्फे तीन हजार ‘विशेष राखी पाकिटे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan 2022

Raksha Bandhan 2022 : टपाल विभागातर्फे तीन हजार ‘विशेष राखी पाकिटे’

औरंगाबाद : राखी पौर्णिमेनिमित्त भारतीय टपाल विभागाने ३ हजार ८०० ‘विशेष टपाल पाकिटे’ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. राखी पौर्णिमेनिमित्त भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्ट विभागाने विशेष राखी पाकीट उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील तसेच औरंगाबाद परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख पोस्ट कार्यालयांमध्ये ही विशेष पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

रक्षाबंधना निमित्त अनेक बहिणी आपल्यापासून दूर राहत असलेल्या भावासाठी टपालाने राखी पाठवत असतात. रक्षाबंधनाचे पाकीट हे इतर पाठवल्या जाणाऱ्या टपालांपेक्षा वेगळे आणि आकर्षक दिसावे या उद्देशाने टपाल विभाग अनेक वर्षांपासून राखीचे स्वतंत्र विशेष पाकीट उपलब्ध करून देत आहे. पाकिटावर पाच रुपयांचे छापील तिकीट असून, एका विशेष पाकिटाची किंमत १० रुपये आहे. डिजिटल युगामध्ये प्रत्यक्ष मिळालेली राखी ही सर्वांना अधिक जवळची वाटते व बहिण भावाच्या पवित्र नात्यामध्ये अधिक गोडवा वाढवते. त्यामुळे डिजिटल युगामध्ये देखील प्रत्यक्ष पोस्टाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांची मागणी वाढत आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील ७६ टपाल कार्यालयासाठी पाच हजार रक्षाबंधनाचे विशेष पाकिटांची मागणी करण्यात आली होती, मात्र ३ हजार ८०० पाकिटे उपलब्ध झाले आहेत. दरम्यान स्पीड पोस्टाद्वारे भारतासह परदेशातही वेळेवर राखी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय औरंगाबाद परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांना राखी टपाल वेळेवर वाटप करण्याबद्दल विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद रिजन मधील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्टमास्तर जनरल कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

दहा रुपयात विशेष राखी पाकिटाची किंमत असून हे पाकिट वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे इतर पाकिट घेण्यापेक्षा नागरिकांनी राखी पाठवण्यासाठी जास्तीत जास्त या विशेष राखी पाकिटांचा वापर करावा.

- अशोक धनवडे, प्रवर अधिक्षक, औरंगाबाद डाक विभाग.

Web Title: Raksha Bandhan 3000 Special Rakhi Packets By Postal Department Rakhi Poornima

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..