'या' गोष्टी पाळल्या तरच कोरोनाची तिसरी लाट सौम्य असेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' गोष्टी पाळल्या तरच कोरोनाची तिसरी लाट सौम्य असेल

'या' गोष्टी पाळल्या तरच कोरोनाची तिसरी लाट सौम्य असेल

औरंगाबाद : कोरोनाच्या (Corona) पहिली, दुसरी लाट आली. या पुढच्या काळात मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबी पाळल्या तरच तिसरी लाट सौम्य असेल. असे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr.Raman Gangakhedkar) यांनी व्यक्त केले. देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन्नशास्त्र महाविद्यालयात (Deogiri Engineering And Mangemen College) डॉ. गंगाखेडकर यांनी ‘इन्स्पायर सिरीज’ अंतर्गत ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. गंगाखेडकर हे ३० जून २०२०ला निवृत्त होण्यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) येथे साथीचे व संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. (Raman Gangakhedkar Said, People Should Follow Corona Norms, So Third Wave Not Severe)

‘‘कुठल्याही नकारात्मक बाबींमुळे खचुन जाऊ नये. या दरम्यान, आवड जोपासा, आपले काम मन लावून करा. त्यातूनच आयुष्यातील खुप मोठ्या गोष्टी साध्य कराल.’’ हे सांगतानाच बालपणी गणितामध्ये १०० पैकी १० वरुन ९९ पर्यंत पोहचल्याचा किस्साही सांगितला. डॉ. गंगाखेडकर यांचे मित्र ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे यांनीही ऑनलाईन माध्यमातुन उपस्थिती लावली. महाविद्यालयाचे (Aurangabad) संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :icmrRaman Gangakhedkar