Bangladesh Hindu Persecution : बांगलादेशला आता धडा शिकवा; निषेध सभेत रामगिरी महाराजांचे आवाहन , हिंदूंना भारतात आश्रय द्या
Ramgiri Maharaj : बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करत रामगिरी महाराजांनी भारताने ठोस भूमिका घ्यावी आणि हिंदूंना भारतात आश्रय द्यावा, अशी मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर : ज्या देशाची निर्मिती भारताने केली, कोरोनाकाळात इस्कॉनसारख्या संस्थांनी तेथील लोकांना जेवण पुरवले, आज तेच बांगलादेशी त्यांच्यावर हल्ले करीत आहेत. हिंदूंची मंदिरे, घरांवर हल्ले करून अत्याचार सुरू आहेत.