
छत्रपती संभाजीनगर : पैठण रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्र परिसरात कृषी विभागामार्फत बुधवारी (ता. १३) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय महोत्सवाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. जिल्हाभरातून आत्मा यंत्रणेसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ५० हून अधिक शेतकऱ्यांनी ३० पेक्षा जास्त रानभाज्या उपलब्ध केल्या होत्या.