esakal | Buddha Jayanti 2021: पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची रांगोळी
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad art

Buddha Jayanti 2021: पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची रांगोळी

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध (gautam buddha) यांच्या जयंतीनिमित्त (, Buddha purnima 2021) औरंगाबाद येथील कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूलचे कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून बुद्धांची प्रतिमा साकारली आहे. पिंपळाच्या पानावर बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचे डॉ. दिनेश गुप्ता (सीईओ, मेंबर ऑफ पार्लमेंट ऑफ वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन असोसिएशन यूएसए) यांनी कळविले आहे.

जगभर कोरोना महामारीचे सावट असताना संपूर्ण विश्व दुःखमय झालेले आहे. यातून सावरण्यासाठी बुद्धांचे तत्त्वज्ञान उपयोगाला येईल, म्हणून ज्या बोधीवृक्षाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशा पिंपळाच्या पानावर राजेश निंबेकर यांनी रांगोळी रेखाटून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. निंबेकर यांनी यापूर्वी विविध महामानवांचे फलक लेखन, पोर्ट्रेट, रांगोळी काढून समाज प्रबोधन केले आहे. नुकतेच त्यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त तळहाताएवढ्या पिंपळ पानावर गौतम बुद्धांची रांगोळी काढली. त्यांच्या या रांगोळी कलेची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

हेही वाचा: मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय पण बीडमधील परिस्थिती चिंताजनक

ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना तीन तासांचा अवधी लागला. ही रांगोळी साकारण्यासाठी केवळ ३५ ग्रॅम रांगोळीचा लागल्याचे निंबेकर यांनी सांगितले. त्यांच्या रांगोळी कलेची ओएमजी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने कमला नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बिपीन नाईक, सचिव बाबुराव नालमवार, मुख्यध्यपिका सुलभा वट्टमवार यांनी अभिनंदन केले.