पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवेंचा दावा | Raosaheb Danve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danve
पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवेंचा दावा

पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवेंचा दावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात. केंद्र सरकार पेट्रोलच्या किंमती वाढवत नाही. त्यामुळे दरवाढीवरुन आमच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे अजब स्पष्टीकरण इंधन दरवाढीवर दानवे (Raosaheb Danve) यांनी दिले आहे. औरंगाबादेत भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्र सरकारने कर घटवला आहे. मात्र राज्य सरकार त्यांचे कर कमी करण्यास तयार नाही. हे आम्ही नागरिकांना सांगणार आहोत, असे दानवे म्हणाले. देश केंद्र (Petrol Diesel Prices Hike) सरकारच्या पैसावर चालत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेत नाहीत. (Aurangabad)

हेही वाचा: भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आवाहन

जर आम्ही याबाबत लोकांना सांगितले तर मला खात्री आहे, की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड दाखवायलाही संघर्ष करावे लागले, असे दानवे म्हणाले.

loading image
go to top