

Sakal Book Festival Begins with Vibrant Book Palkhi Rally
Sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन महाविद्यालयातून शनिवारी (ता. १७) सकाळी साडेदहाला ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा आणि भारताचे संविधान यांसारखे मौलिक ग्रंथ पालखीतून मिरवत विद्यार्थी, युवकांनी लक्ष वेधून घेतले. यानिमित्त भारतमातेसोबतच वाचनसंस्कृतीचाही विद्यार्थ्यांनी जयघोष केला.