dr. naval thorat
sakal
वाचन हा केवळ छंद नाही. तो व्यक्तिमत्त्व घडवणारा संस्कार आहे. लहानपणी लागलेली वाचनाची सवय आयुष्यभर समृद्ध फळे देते. चांगली पुस्तके जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात, विचारांना चालना देतात आणि आत्मभानाची जाणीव करून देतात. साहित्य मानवी इतिहास आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. चिकित्सक वाचनामुळे विवेक, सहानुभूती आणि संवादकौशल्य विकसित होते. फ्रान्सिस बेकन यांनी म्हटलेच आहे, की ‘वाचन माणसाला परिपूर्ण बनवते.’ हे खरेच आहे.
- डॉ. नवल थोरात, प्राचार्य, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर