Mahavitaran : ऐन हिवाळ्यात राज्यात विक्रमी वीज मागणी; महावितरणकडून शनिवारी २५ हजार ८०८ मेगावॉटचा पुरवठा
Electricity Supply : शनिवारी राज्यात २५,८०८ मेगावॉट विजेची विक्रमी मागणी नोंदविली गेली. महावितरणने नियोजन केले असल्याने कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता या मागणीची पूर्तता केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी (ता. ११) राज्यात २५ हजार ८०८ मेगावॉट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली आहे.