esakal | Breaking News| औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 Remdesivir इंजेक्शन चोरी

बोलून बातमी शोधा

Remdesivir

Breaking News| औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 Remdesivir इंजेक्शन चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी धोका कायम असल्याचे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. सर्व रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपयोगी ठरत आहे पण त्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 रेमडेसिव्हर इंजेक्शन चोरीला गेले आहेत. याबद्दल आयुक्तांनी खुलासा मागितला आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. सध्या मराठवाड्यात बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिरचा काळा बाजार सुरु असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा: अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी

राज्यभरात सगळीकडे रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना औरंगाबादमधील ही घटना धक्कादायक आहे. प्रशासनाने वेळोवेळी सांगितले आहे की, सरकारने सांगितलेल्या ठिकाणांवरच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळेल. पण याचा काळा बाजार मोठा तेजीत सुरु असल्याचे चित्र आहे.