esakal | 'मोदी चॉकलेट' वाटून केंद्र सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव (जि.औरंगाबाद) : पेट्रोल, डिझेल व खाद्य तेल दरवाढी विरोधात मोदी चाॅकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

सर्वसामान्यांकडे त्यांचे लक्ष नाही, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

'मोदी चॉकलेट' वाटून केंद्र सरकारचा निषेध

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल (Fuel Price Hike) आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने (Edible Oils Price Hike) वाढ होत आहे. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेतर्फे (Republic Sene) केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत 'मोदी चॉकलेट' वाटप करत निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) केवळ आश्वासननाचे 'चॉकलेट' वाटतात. सर्वसामान्यांकडे त्यांचे लक्ष नाही, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे (Aurangabad) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Alliance Government) अबकारी कर कमी करून इंधनचे दर आटोक्यात आणावे. या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. दिल्ली गेट येथील पेट्रोल पंम्पसमोर तसेच रांजणगाव (शे.पू) येथे शुक्रवारी (ता.११) हे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आले. (Republican Sena Agitation Against Union Government For Fuel Price Hike In Aurangabad)

हेही वाचा: अनुदानाच्या प्रतीक्षेत अखेर शिक्षकाच्या आयुष्याची दोर तुटली

आंदोलनात पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना 'मोदी चॉकलेट' देण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रा. सिद्धोधन मोरे, काकासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे, मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, मनिषा साळुंके, चंद्रकांत रुपेकर, सचिन गायकवाड, विकास हिवराळे, गौतम गायकवाड, बबन साठे, कैलास निळे, राहुल कानडे, शैलेंद्र म्हस्के, दिनेश गवळे, सचिन जगधने, दीपक जाधव, कुणाल भालेराव, सागर प्रधान, सचिन शिंगाडे, रामराव नरवडे, पप्पू दाभाडे, प्रवीण बनकर, रवी मोरे, नंदू मनोहर, कृष्णा मोरे, आनंद भिसे, पुष्पा स्वामी, के. जी. पवार, जय कारके, मयूर पवार आदीं सहभागी झाले होते.