esakal | अनुदानाच्या प्रतीक्षेत अखेर शिक्षकाच्या आयुष्याची दोर तुटली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive doctor dies during treatment

कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिन्यांपासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. तसेच रोजगार ही नसल्याने अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असतानाच ते मागील काही दिवसांपासून आजारी होते.

अनुदानाच्या प्रतीक्षेत अखेर शिक्षकाच्या आयुष्याची दोर तुटली

sakal_logo
By
निसार शेख

आष्टी (जि.बीड) : शिक्षणाबाबतीत (Education Policy) शासनाच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील अनेक विनाअनुदानित शिक्षकांच्या (Non-Aided Teachers) कुटुंबाची राखरांगोळी झाली. आज ना उद्या आपल्याला अनुदान मिळेल व आपल्या कुटुंबाची गरिबी दूर होईल, अशी आस लागलेल्या व मागील वीस वर्षांपासून अनुदानाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या आष्टी (Ashti) तालुक्यातील धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.राजेंद्र शिरोळे यांचे गुरुवारी (ता.दहा) रात्री निधन झाले. त्यांच्यावर धानोरा येथील अमरधाम येथे शुक्रवारी (ता.११) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरोळे हे मागील १८ वर्षांपासून आष्टी तालुक्यातील धानोरा (Beed) येथील विनाअनुदानित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना ही त्यांनी हिंदी, मराठी, समाजशास्त्र व राज्यशास्त्र या चार विषयात एमए केले. तर बीएड, एमएड, एम.फील, पीएच.डी या पदव्या मिळवल्या. (Non Aided Teacher Died In Ashti, He Didn't Get Salary)

हेही वाचा: तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पैठणच्या दावरवाडीमधील घटना

कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिन्यांपासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. तसेच रोजगार ही नसल्याने अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असतानाच ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. प्रा.शिरोळे यांना पत्नी व दोन लहान मुली असल्याने कुटुंबावर संकट ओढावले आहे. मागील १८ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रा.शिरोळे या शिक्षकाच्या आयुष्याची अखेर दोर तुटली.