
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी पदवी परीक्षेचा डेटा पाच महाविद्यालयांनी वेळेत प्रसिद्ध केला नाही, म्हणून पाच महाविद्यालयांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड आकारून दंड भरल्यानंतर विद्यार्थ्यांचे राखीव निकाल जाहीर करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या ऑनलाइन बैठकीत मंगळवारी (ता. १९) घेण्यात आला.