
औरंगाबाद : राज्यात आणि औरंगाबादेत बुधवारी (ता. १०) आतापर्यंत सगळ्यात जास्त रुग्ण आढळून आले होते. मात्र औरंगाबादेत कालपेक्षाही रुग्ण वाढीचा नको असलेला उच्चांक आज (ता. ११) झाला. सकाळच्या सत्रात तब्बल १३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ही गंभीर बाब असून हा अनलॉकचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
८ मे रोजी १०० रुग्ण, १५ मे रोजी ९३ रुग्ण बाधित झाले होते. ही लॉकडाउनमधील स्थिती होती. अनलॉक-१ मध्ये संसर्ग वाढत असून एक दिवस (४५ रुग्ण ) वगळता बाधितांचा आकडा ७० व त्यापेक्षा अधिक आहे. ९ जूनला ८१ रुग्ण आणि बुधवारी (ता. १०) १२५ जण बाधित झाल्यानंतर आज तर हद्द झाली. तब्बल १३२ जणांना बाधा झाल्याने आता तीनच दिवसात रुग्णाचा आकडा ३३८ इतका झाला आहे. आता जिल्ह्यात २ हजार ४०७ रुग्ण बाधित आहेत. तर १ हजार ३१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण १२१ जणांचा बळी गेला आहे. तर ९७९ जणांवर उपचार सुरु आहेत. नागरिकांनीही घराबाहेर पडताना अधिक सुरक्षित राहण्याची आणि विशिष्ट अंतर राखून व्यवहार करण्याची अधिक गरज आहे. हे केल्यासच संसर्गाचा आलेख कमी होऊ शकेल.
जिल्ह्यात आज आढळलेले १३२ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
जयसिंगपुरा, बेगमपुरा (१), मिसरवाडी (१), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (१), उस्मानपुरा (२), एन आठ (१), जुना बाजार (१), आकाशवाणी परिसर (१), उल्कानगरी (१), संजय नगर (१), एन दोन सिडको (१), गणेश कॉलनी (१), बुड्डीलेन (१), बायजीपुरा (१), बंजारा कॉलनी (१), हेडगेवार रुग्णालय परिसर (१), एमजीएम रुग्णालय परिसर (१), शिवाजी नगर (५), उत्तम नगर (३), कैलास नगर (७), गादिया विहार (१), सहकार नगर (१), नक्षत्रवाडी (१), चेलीपुरा (१), टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी (१), संजय नगर, बायजीपुरा (१), एन सात सिडको (१), न्यायनगर (२), हुसेन कॉलनी (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), सातारा परिसर (१), साईनगर, एन सहा (२), एन आठ सिडको, गजराज नगर (१), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (२), हरिप्रसाद अपार्टमेंट (१), दशमेश नगर (१), पद्मपुरा (२), गांधी नगर (३),सिल्कमिल कॉलनी (१),विशाल नगर (३), बेगमपुरा (२), गोविंद नगर (१), समता नगर (१), फाजीलपुरा (४), न्यू हनुमान नगर (५), सिडको एन आठ (१२), गौतम नगर, घाटी परिसर (२), रशीदपुरा (१), मयूर पार्क म्हसोबा नगर (१), भवानी नगर (२), भारतमाता नगर (३), विजय नगर (१), गारखेडा, गजानन नगर (१), कोहिनूर कॉलनी (१), जिल्हा परिषद परिसर (१), हर्सुल सावंगी (१), सिव्हील हॉस्पीटल परिसर (३), टी व्ही सेंटर (१),बिस्मिला कॉलनी (३), सिडको वाळूज महानगर एक (२), एकता नगर, हर्सुल परिसर (१), बजाज नगर (७), साई नगर, पंढरपूर (३), जुनी मुकुंदवाडी (७), नारेगाव (१), गंगापूर (१), नायगाव (१), सिल्लोड (१), उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर (१), अन्य (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ५७ महिला आणि ७५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.