Madhubhai Kulkarni : पंतप्रधान मोदींना राजकारणात आणणारे RSS चे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णींचं निधन; देहदानाचा केला होता संकल्प
RSS Senior Pracharak Madhubhai Kulkarni Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच मधुभाईंच्या तब्येतीची केली होती विचारपूस
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई (माधव विनायक) कुलकर्णी (वय ८८) यांचे काल (ता. १८) दुपारी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील हेडगेवार रुग्णालयात निधन झाले.