

Confidence on the Track: Prof. Dr. Sachin Ghughe Completes 1,154 km in a Year
Sakal
उदगीर (जि. लातूर): ‘सध्याचे जीवन धावपळीचे, धकाधकीचे झाले आहे. जो तो वेळ नाही, असे सांगत पळतो आहे’ अशी काहीशी चर्चा नित्य कानी पडते. पण आरोग्यासाठी, व्यायामाचा एक भाग म्हणून पळले तर जीवनातील धावपळ अधिक आनंदी बनवू शकते. असाच काहीसा अनुभव येथील प्रा.डॉ. सचिन शेषराव घुगे यांनी घेतला. सरत्या वर्षभरात त्यांनी तब्बल ११५४ किलोमीटर धावण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.