esakal | ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे, आठवड्याभरात ४ तालुक्यांत शून्य रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे, आठवड्याभरात ४ तालुक्यांत शून्य रुग्ण

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद: ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असून, आठवड्याभरात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी चार तालुक्यांत शून्य रुग्ण संख्या आढळली आहे; तर बाधित रुग्णांच्या संख्येतही घट होत असल्याने ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. ग्रामीण भागात ऐके काळी रौद्ररूप धारण केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायाला दिलेला प्रतिसाद यामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होत आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी (ता. १२) पाच तालुक्यांत शून्य रुग्ण संख्या आढळली तर मंगळवार, बुधवार चार तालुके व गुरुवार, शुक्रवार, शनिवारी तीन व रविवारी चार तालुक्यात शून्य रुग्ण संख्या आढळली आहे. त्यापाठोपाठ नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्याही पन्नासच्या आत सापडत आहे. दरम्यान, खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतीची कामे सुरळीत चालू असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला ग्रामीण भागात गावाचे गाव बाधित आढळत होते. परंतु, आता जिल्ह्यातील बहुतांश गाव ही कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. यात आतापर्यंत ५९ हजार ७३० बाधित रुग्ण सापडले असून, ५७ हजार ९३७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्याघडीला २५८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. १,५३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत आजही लसीकरण बंदच, ४० हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

दहाच्या आत ॲक्टिव्ह रुग्ण संख्या असलेले तालुके-
-सोयगाव-०, खुलताबाद-४, सिल्लोड-७

आठवड्याभरात पन्नासच्या आत नवे बाधित रुग्ण-
-सोमवार- १५
-मंगळवार-२२
-बुधवार-२५
-गुरुवार-३८
-शुक्रवार-३६
-शनिवारी-२९
-रविवार- १९

loading image