

Chhatrapati Samabhajinagar
esakal
बजाजनगर: वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथे गट क्रमांक ५३ मधील भंगार गोदामाला सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागून दोन गोडाऊन खाक झाल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.