Sakal Event: ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीत ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचा वर्धापन दिन; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Sakal Marathwada Celebrates 26 Glorious Years : छत्रपती संभाजीनगर येथे ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. केतकी माटेगावकर यांच्या सुरेल गायनासह विविध मान्यवरांचा सहभाग आणि वाचकांची प्रचंड गर्दी लाभली.
छत्रपती संभाजीनगर : सुंदर सजावट, रोषणाईने सजलेला संत एकनाथ रंगमंदिराच्या आवारातील मंडप, सनईचे मंजुळ सूर अशा उत्साही वातावरणात, रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीने रविवारी (ता. एक) ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचा २६ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा झाला.