औरंगाबाद : सखी’च्या कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

पीडितांना न्याय देणाऱ्या यंत्रणेतील महिला कर्मचारीच संकटात
औरंगाबाद : सखी’च्या कर्मचाऱ्यांना काढले बाहेर

औरंगाबाद : महिलांच्या हक्काचा निवारा असलेल्या सखी वन स्टॉप सेंटरचा(sakhi one stop center) भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाही संस्थेच्या विरोधात कारवाई झाली नाही. उलट संस्थाचालकांनी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक बेकायदेशीरपणे कामावरुन बाहेर काढले. त्यामुळे गुरुवारी (ता. २४) रात्री उशीरापर्यंत कर्मचारी संस्थेच्या बाहेर ठिय्या देऊन होते. घोटाळा करणाऱ्या संस्थेला आश्रय दिल्यानेच संस्थाचालकाची ही हिम्मत झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

औरंगाबाद : सखी’च्या कर्मचाऱ्यांना काढले बाहेर
Aurangabad News : कोरोना लसीकरण सक्तीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

केद्र शासनाच्या(central government) अनुदानातून प्रत्येक जिल्ह्याला सखी वन स्टॉप सेंटर चालवले जाते. या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी(collector aurangabad) आहेत. तर सचिव जिल्हा महिला बालविकास अधिकारी असतात. महिलांसाठी चोवीस तास हक्काचा निवारा मिळावा, रात्री बेरात्री अडचणीत सापडलेल्या महिलांना थेट राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने देशभरात सखी वन स्टॉप सेंटर चालवले जातात. औरंगाबादेत पैठणच्या माऊली बहुउद्देशिय संस्थेला सखी वन स्टॉप सेंटर चालवण्यासाठी दिलेले आहे. तब्बल १४ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर असताना संस्थेने पाच-सहा कर्मचाऱ्यांची भरती केली. उर्वरित इंटरव्ह्युसाठी आलेल्यांची नावे मस्टरवर टाकून त्यांच्या नावाने मानधन उचलल्याच्या तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे कॅन्टोनमेंट जन अधिकार मंचतर्फे तसेच कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि महिला बालकल्याण आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. असे असतानाही अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा बालविकास विभागाने साधी दखलही घेतली नाही.

सेंटरमध्ये सध्या प्रत्यक्षात काम करणारे कर्मचारी ममता मोरे (केंद्र प्रशासक), रोहित राक्षे (आयटी विभाग), उज्वला इंगोले (केसवर्कर), मिरा धुमाळ (सुरक्षा रक्षक) हे कार्यरत आहेत. उर्वरित कर्मचारी मस्टरवरच आहेत. असे असताना संस्थाचालकांनी गुरुवारी (ता. २३) चार वाजता अचानक सर्व कर्मचऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याचे सांगत बाहेर काढले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या बाहेरच रात्री उशीरापर्यंत ठिय्या दिला. आम्हाला बेकायदेशीर कसे काढता येते हे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी केद्र प्रशासक ममता मोरे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com