Sambhaji nagar : शोभायात्रेने वेधले लक्ष ; सियावर रामचंद्र की जय’चा जयघोष

शोभायात्रेत घोडे, उंट, चित्ररथ, सजीव, निर्जीव देखावे, भजनीमंडळ, वारकरी
शोभायात्रेत
शोभायात्रेतsakal

छत्रपती संभाजीनगर : हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संस्थान गणपती येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेने बुधवारी (ता. २२) लक्ष वेधले. शोभायात्रेत घोडे, उंट, चित्ररथ, सजीव, निर्जीव देखावे, भजनीमंडळ, वारकरी, बालकांसह महिला, नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी ‘सियावर रामचंद्र की जय’चा जयघोष करण्यात आला.

राजाबाजार येथील संस्थान गणपती येथून सायंकाळी भव्य शोभायात्रेला महाआरती करून सुरवात झाली. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे,

माजी महापौर नंदकुमार घोडेले, स्वागत समितीचे अध्यक्ष जयवंत (बंडू) ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. ढोलताशे, बॅण्डपथक, टाळकरी, महिला भजनी मंडळ, निल्लोड येथील वारकरी विद्यालयाचे विद्यार्थी, घोडे, उंट, सजीव व निर्जीव देखावे शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रा शहागंज, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, महात्मा फुले चौक, नारळीबागमार्गे खडकेश्वर येथील महादेव मंदिरात विसर्जित करण्यात आली. ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

शोभायात्रेत
Sambhaji Nagar News : जावयाने सासऱ्याची कापली दोन बोटे!

मिरवणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, विश्वनाथ स्वामी, शहर संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडे, संतोष जेजूरकर, अनिल पोलकर,

शोभायात्रेत
Sambhaji nagar : गुढीपाडव्यानिमित्त ; तीनशे कोटींची उलाढाल

मोहन मेघावाले, सचिन खैरे, किशोर कच्छवाह, ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे, किरण तुपे, भाऊ सुरडकर, प्रफुल्ल मालाणी, महावीर पाटणी, मिलिंद दामोदरे, पुरुषोत्तम कुलकर्णी, चंद्रकांत गवई, दयाराम बसैय्ये, सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, कला ओझा, विद्या अग्निहोत्री, लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, मंजूषा नागरे, युवा सेनेचे उपसचिव यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com