
Sambhaji nagar : घरातून विवाहिता चिमुकलीसह बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षाच्या चिमुकलीसह ३२ वर्षीय विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाली. शिल्पा योगेश दाभाडे (वय २८, रा. खंडोबा मंदिराजवळ, सातारा गाव) असे त्या बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. तर सिद्धी (वय २) असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
ही घटना २३ मार्च रोजी बारा वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी बेपत्ता महिलेचा पती योगेश सुलेभान दाभाडे (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता बेपत्ता झाली. बेपत्ता शिल्पा हिचा रंग गोरा, उंची पाच फूट, दोन इंच, लांबट चेहरा, काळे व लांब केस,
अंगावर क्रीम कलरची साडी, निळा ब्लाऊज, पायात चप्पल असून ती मराठी भाषा बोलते. तिच्यासोबत दोन वर्षांची चिमुकलीही आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास सातारा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन हेड कॉन्स्टेबल देविदास राठोड यांनी केले आहे.