sambhaji nagar : दोन दिवसांत दोन तरुणाच्या आत्महत्या Sambhaji Nagar two youth Suicide both unclear registered | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

Sambhaji nagar : दोन दिवसांत दोन तरुणाच्या आत्महत्या

पाचोड : दोन दिवसांत दोन तरुणांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना पाचोड (ता.पैठण) येथे घडली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी पाचोड ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड खुर्द (ता.पैठण) येथील ३५ वर्षीय शिवाजी बाबासाहेब उचित हा मोलमजूरी करून उदरनिर्वाह करीत असे. त्याने रविवारी (ता.१२) दिवसभर तो बस स्थानकामध्ये काम करून घरी गेला व रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.

ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यास पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत पाठविले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी (ता.१४) त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची पाचोड ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तर पाचोड (बु) (ता.पैठण) येथे दुसरी घटना घडली. येथील ३२ वर्षीय सचिन महादेव शेळके हा तरुणही मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत होता. त्याने सोमवारी (ता.१३) सायंकाळी विषारी औषध प्राशन केले.

नातेवाइकांच्या लक्षात येताच येथील ग्रामीण रुग्णालया दाखल केले. असता वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरुषोत्तम साबळे यांनी प्रथमोपचार करून घाटीत पाठविले. मात्र, सचिनची प्रकृती नाजूक झाल्याने नातेवाइकांनी अर्ध्या रस्त्यातून परत आणून पाचोड येथे पुन्हा उपचारार्थ दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

मंगळवारी (ता.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख नोमान यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक पवन चव्हाण करीत आहे