Sambhaji Nagar : जि.प.च्या शिक्षण विभागात भरली उर्दू शाळा; शाळेत शिक्षक नसल्याने पालक आक्रमक

ढोरकीन येथे अनेक वर्षांपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal

Sambhaji Nagar - पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील संतप्त पालकांनी उर्दू माध्यमांचे शिक्षक मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह थेट जिल्हा परिषद शिक्षण विभाग गाठत कार्यालयात वर्ग भरवून आंदोलन केले. यानंतर शिक्षण विभागाला जाग आल्याने तात्पुरत्या एका शिक्षकाची नियुक्ती शाळेवर करण्यात आली आहे.

ढोरकीन येथे अनेक वर्षांपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेला २०१४ पासून इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गासाठी मान्यता मिळालेली असून या ठिकाणी एकूण १७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, एवढे विद्यार्थी असून केवळ एकच नाममात्र शिक्षकांच्या खांद्यावर इयत्ता आठवी ते दहावीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आली आहे.

Sambhaji Nagar
Mumbai Crime : बँकेची 80 कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी CBIची शोध मोहीम... सीबीआयकडून गुन्हा दाखल

यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्यामुळे ढोरकीन येथील शालेय समिती अध्यक्ष अजहर अय्युब कुरेशी तसेच माजी शालेय समिती अध्यक्ष रफीक हमिद महलेदार व पालकांनी शिक्षण विभागाला वेळोवेळी अर्ज व निवेदने देऊनकिमान दोन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केलेली आहे.

निवेदनाला केराची टोपली

पालकांनी वेळोवेळी केलेल्या विनंती अर्ज व निवेदनाचा छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी केराची टोपली दाखविली. यामुळे सोमवारी संतप्त शालेय समिती अध्यक्ष अय्युब कुरेशी, रफीक महलेदार, कलीम शहा, फजल शेख, सलीम शेख,

अझर कुरेशी, मजिफ कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण विभागाच्या दालनातच वर्ग भरविला. या ठिकाणी किमान दोन शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली .

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar : कर वसुलीसाठी आता नवा पॅटर्न, महिनाभरात अंमलबजावणी; पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

अधिकाऱ्यांनी दिले लेखी पत्र

पालकांची संतप्त भूमिका आणि त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार अखेर शिक्षण विभागाला करावा लागला आहे. शिक्षण विभागाने सद्यस्थितीला तात्पुरते शिक्षकाची नियुक्ती केल्याचे पालकांना सांगितले. तसेच लवकरच कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक केली जाईल, अशा आशयाचे लेखी पत्रही विभागाने पालाकांना दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com