Mumbai Crime : बँकेची 80 कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी CBIची शोध मोहीम... सीबीआयकडून गुन्हा दाखल

कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक नोंदी असलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करून सादर
cbi registers case against mumbai based aluminium foil company director for 80 crore bank fraud crime
cbi registers case against mumbai based aluminium foil company director for 80 crore bank fraud crimesakal

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाचे एसबीआयचे 80 कोटी 73 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने नुकताच दहिसर येथील ॲल्युमिनियम फॉइलची निर्मिती करणारी कंपनी, तिचे संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबईसह गाझियाबाद, हिमाचल प्रदेश येथे सीबीआयने शोध मोहीम राबवली.

या कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक नोंदी असलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करून सादर केले. त्याद्वारे मिळालेली कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. 2009 ते 2021 या कालावधी हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

cbi registers case against mumbai based aluminium foil company director for 80 crore bank fraud crime
CBI Investigation Cases: तामिळनाडूशिवाय 'या' 10 राज्यांमध्ये सीबीआयच्या चौकशीवर आहे बंदी, काय आहे नियम?

याप्रकरणी मे. पार्थ फॉईल, कंपनीचे संचालक पार्थो विजोय दत्ता व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, कंपनीची कर्जाची खाती 2021 मध्ये बुडीत घोषित करण्यात आली होती. त्याबाबत करण्यात आलेल्या तपासणीत कर्ज मिळवण्यासाठी कर्जदार कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी फेरफार केलेले स्टॉक बुक, स्टेटमेंट सादर करण्यात आले.

cbi registers case against mumbai based aluminium foil company director for 80 crore bank fraud crime
Mumbai Crime : युनियन बँकेची कोट्यवधीची फसवणूक; के.जे. इन्फ्रा कंपनी विरोधात CBI कडून गुन्हा

तसेच कर्जाची रक्कम इतरत्र वळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, गाझियाबाद आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी यासह अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्यात संशयीत कागदपत्रे, हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com