
छत्रपती संभाजीनगर : शहरात सुमारे साडेआठ हजार मालमत्ताधारकांकडे सुमारे ३०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असून, वारंवार नोटिसा देऊन देखील कर भरला जात नसल्याने प्रशासनाने आता जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या थकबाकीदारांना लवकरच नोटिसा बजावल्या जाणार आहेत.