Sambhajinagar Book Fesatival
sakal
औरंगपुरा - आजचा संडे काही औरच होता. गुलाबी थंडीत वाचकांनी मोठी गर्दी करीत पुस्तकांच्या सहवासाची ऊब अनुभवली. नवीन लेखकांची नवीन पुस्तके खरेदीबरोबरच कायम वाचली जाणारी आणि प्रत्येक घरात हवीच, अशी पुस्तके अनेकांच्या हाती दिसत होती. रविवारची सुटी असल्याने वाचकांनी पुस्तक खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.