

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: गुजरात येथील तिघांनी कासारी बाजारातील सराफा व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिने बनवून देण्याएवजी तब्बल २ कोटी ८८ लाख २९ हजार ९६० रुपयांचे २ किलो सोने घेऊन धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जयदीप हरकिशन झिंझुवडिगा, विशाल हरकिशन झिंझुवडिगा आणि कल्पेश झिंझुवडिगा (सर्व रा. राजकोट, गुजरात) अशी आरोपींची नावे आहे.