Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage
esakal
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे
Fear of Gas Shortage Triggers Advance LPG Bookings: छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईच्या भीतीने ग्राहकांनी आगाऊ बुकिंग सुरू केल्याने एलपीजी सिलिंडरची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी अनेक गॅस एजन्सींवर ८ ते १० दिवसांची वेटिंग लागली असून ऐनवेळी गॅस संपलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.
छत्रपती संभाजीनगर: गॅस टंचाईच्या भीतीने वेळेवर गॅस भेटणार नाही. ऐनवेळी पंचाईत होईल, या भीतीने डबल गॅस टाकी असलेल्या बहुतांश ग्राहकांनी आगाऊ बुकिंग सुरू केली. त्यामुळे मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला. परिणामी, आता सिलिंडरसाठी ८ ते १० दिवसांपर्यंत वेटिंग वाढली. अशा स्थितीत ज्यांना खरोखर गरज आहे, अशा ऐनवेळी गॅस संपलेल्या ग्राहकांची मात्र तारांबळ उडाल्याचे चित्र शुक्रवारी (ता.१३) ‘सकाळ’च्या पाहणीतून समोर आले.

