

Election Announced but Forms Missing: Chaos at Phulambri Tehsil Office
Sakal
फुलंब्री : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र फुलंब्री येथील तहसील कार्यालयात १५ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, त्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.