Chh. Sambhajinagar: रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाला गोळ्या झाडून संपवलं, ४० दिवसांनी उघड; कच्च्या इंग्रजीमुळे सापडले, तिघांना अटक

Retired Engineering College HOD Shot Dead: छत्रपती संभाजीनगरमध्ये रिॲलिटी शोच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक करून सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त एचओडीने तरुणांसोबत मैत्री केली. त्या तरुणांनी रिॲलिटी शोच्या रंगवलेल्या स्वप्नात एचओडीने ५० लाख रुपये अडकवले. या व्यवहारातून वाद झाले आणि त्या तरुणांनी फार्म हाउसवर झालेल्या पार्टीत सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com