

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: वाढते प्रदूषण आणि इंधनाचे गगनाला भिडलेले दर यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाते. मात्र, चार्जिंगची समस्या मोठी अडचण ठरते. यावर मात करण्यासाठी हर्षवर्धन कर्णिक आणि अर्जुन राजपूत या संशोधकांनी ‘सेल्फ-पॉवर जनरेटिव्ह फोरव्हीलर कार सिस्टीम’ विकसित केली आहे. केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाने नुकतेच हे पेटंट प्रसिद्ध केले आहे.