संपतराव जाधव विद्यालयात

संपतराव जाधव विद्यालयात
Published on: 
संपतराव जाधव विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लातूर, ता. २५ : औसा तालुक्यातील लखनगाव येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या संपतराव जाधव विद्यालयात संस्थेचे संस्थापक सचिव नरसिंगराव देशमुख यांच्या स्मरणार्थ चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये शाळेतील ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी नऊ गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत आरती ढगे, आदिती जाधव व निकिता सूर्यवंशी यांनी, निबंध स्पर्धेत निकिता सूर्यवंशी, वैष्णवी कांबळे व मानवी बंडगर यांनी, तर चित्रकला स्पर्धेत रुद्रा मोरे, राजनंदिनी नलवाडे व अनुष्का सूर्यवंशी यांनी पुरस्कार पटकावले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण शनिवारी (ता. २४) विद्यालयात करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. मनोज देशमुख, उपाध्यक्ष पांडुरंग माळी, ज्येष्ठ सदस्य व्यंकट गोडभरले, सहसचिव प्रताप देशमुख, कोषाध्यक्ष संतोष देशमुख, सदस्य यशवंत देशमुख, मुख्याध्यापक रमेश यादव, उपमुख्याध्यापक ढगे, गायकवाड तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि शैक्षणिक प्रगतीसोबतच सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ----- LTR26B15455 लातूर : लखनगाव येथील संतपराव जाधव विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com