संजय केनेकर यांनी विधानपरिषदेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल | Sanjay Kenekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Kenekar
संजय केनेकर यांनी विधानपरिषदेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल

संजय केनेकर यांनी विधानपरिषदेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या (Legislative Council Bypoll) एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज सोमवारी (ता.१५) भाजपतर्फे औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल सावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा: प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी

भाजपतर्फे नुकतीच केंद्रेकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानुसार मुंबईत आज अर्ज प्रक्रिया पार पडली. केनेकर यांची लढत काँग्रेस उमेदवार डाॅ प्रज्ञा सातव यांच्याशी होणार आहे.

loading image
go to top