देशात भाजप पेटवा-पेटवीचे राजकारण करित आहे, संजय राऊतांची टीका | Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut
देशात भाजप पेटवा-पेटवीचे राजकारण करित आहे, संजय राऊतांची टीका

देशात भाजप पेटवा-पेटवीचे राजकारण करित आहे, संजय राऊतांची टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : देशात भाजप पेटवा-पेटवीचे राजकारण करित आहे, अशी टीका शिवसेना (Shiv Sena) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. शनिवारी (ता.१३) शिवसेनेच्या वतीने औरंगाबादेत महागाईविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या प्रसंगी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. अमरावती येथील दंगलीबाबत ते म्हणाले, की भारतीय जनता पक्षाला जे हवे ते रझा अकादमी (Aurangabad) करित आहे. अमरावतीचे राजकारण बिघडवले जात आहे. त्याची तपास करायची गरज आहे. मला वाटत नाही की दंगलखोर वेगळे आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर (Petrol-Diesel Prices Hike) अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. केंद्र सरकारने पन्नास रुपयांनी कमी करावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. स्मृती इराणी व त्यांचा पक्ष महागाईविरोधात आंदोलन करत होते. स्मृती इराणींनी औरंगाबादेत यावे त्यांना आम्ही ५० गॅस सिलिंडर देऊ असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या महागाईमुळे लहान व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हेही वाचा: संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

दुसरीकडे नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी १८ कोटींचे विमान खरेदी केले आहे. अशा सरकारचे करायचे काय?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. सर्वात स्वस्त वस्तू माचिस बाॅक्स. आता तो दोन रुपयांनी महाग झाल्याचे त्यांनी सांगितले. या महागाईविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रोश करायचे नाही का, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाचे समर्थन केले आहे.

loading image
go to top