esakal | संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut News

छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राजधर्माचे पालन केले. त्यांचे आपण पाईक आहोत. राजधर्माचे पालन केले नाही तर देश अडचणित येईल, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत

sakal_logo
By
सुनील इंगळे

औरंगाबाद  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाहीत. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवधर्माचेच राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजधर्म चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यांना तो शिकविण्याची गरज नाही. राजधर्म सर्वांनीच पाळायचा असतो. मग ते सत्ताधारी असोत की विरोधी, असा टोला विरोधकांना श्री.राऊत यांनी लगावला.

वाचा -  गर्दी पाहून आस्तिककुमार पांडेय जेव्हा भडकतात...


रविवारी (ता.२८) औरंगाबादेत एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत हे आले आहेत. त्यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांना विचारले असता राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणाचाही दबाव मानत नाहीत. ते राजधर्म चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यामुळे त्यांना त्याची आठवण करुन देण्याची गरज नाही. पण आपण न्यायालयाच्या भूमिकेत जाणेही योग्य नाही. मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.


वाचा -  औरंगाबाद शहरातील शाळा, शिकवण्या १५ मार्चपर्यंत बंदच

राजधर्मावरून राज्यपाल यांच्यावर राऊतांचा निशाणा

वनमंत्री संजय राठोड यांच्या बाबतीत सरकार राजधर्माचे पालन विसरले आहे का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, राजधर्माचे पालन अनेकांनी करायचे असते. ज्याच्या हातात राजदंड आहे. त्या प्रत्येकाने करायचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राजधर्माचे पालन केले. त्यांचे आपण पाईक आहोत. राजधर्माचे पालन केले नाही तर देश अडचणित येईल, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, देशात पंतप्रधानांवर सातत्याने टीका होत असते. महाराष्ट्रातही राज्यपाल ज्या प्रकारे राजकारणात करतात ते वेगळ्या प्रकारचे आहे. तो राजधर्म नक्कीच नाही असेही राऊत म्हणाले.

औरंगाबादच्या ताज्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर विचारले असता संजय राऊत म्हणाले,  संजय राठोड यांच्यावरील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत जाताय, असा सवाल त्यांनी माध्यमांना विचारला. तसेच पुढे जाऊन वेट अँड वॉच, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image