Sanjay Raut |आमच्याविरोधात कारस्थानं करणाऱ्यांच्या छाताडावर पाय देऊन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut

आमच्याविरोधात कारस्थानं करणाऱ्यांच्या छाताडावर पाय देऊन...

औरंगादाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी महागाईविरोधात आंदोलन केलं. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. महागाई वाढली म्हणजे अन्याय वाढला, असं ते म्हणाले. महागाई हा एका राज्याचा विषय नसून ती राष्ट्रीय समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांना धारेवर धरताना, 'आमच्याविरोधात कारस्थानं करणाऱ्यांच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ,' असे राऊत म्हणाले.

2014 सालापर्यंत 78 रुपये असणारं पेट्रोल आता 125 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. केंद्राने 50 रुपयांने पेट्रोल कमी केल्यास आम्ही राज्य सरकारमध्येही पेट्रोलचे दर कमी करण्याचा विचार करू, असे ते म्हणाले.

किमान शेंगदाणे तरी स्वस्त करा..काही जणांची संध्याकाळची सोय!

सध्या गॅस महाग आहे, रॉकेल महाग आहे, डिझेल महाग आहे, शेंगदाणे महाग झालेत. किमान शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा, अनेकांसाठी ती संध्याकाळची सोय असते, असा मिश्किल टोला लगावल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. लोकांनी जगायचं कसं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होत्या

औरंगाबादमध्ये केंद्र सरकारवर टीका करताना राऊत यांनी महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनाही लक्ष्य केलंय. काँग्रेस सरकारमध्ये स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होत्या. आता त्यांनी मौन धारण केलंय, असा टोला राऊत यांनी लगावला.

पाच वर्षांपूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होत्या. आता त्यांनी मौन धारण केलंय. अनेक ठिकाणी उज्वला योजनेत हजारो सिलेंडर भंगारात काढले. त्याकडे केंद्र सरकारचं लक्ष्य नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

loading image
go to top