

Chhatrapati Sambhajinagar: Drunk Youths Create Ruckus Outside Minister Sanjay Shirsat’s Residence
esakal
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या खासगी निवासस्थानासमोर गुरुवारी रात्री तीन मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. या तरुणांनी घरासमोर बाटल्या फोडल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.