फोटो
--
LTR15HTP01.jpg संजीव सोनवणे
LTR15HTP02.jpg
लातूर ः डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांच्या पद्मानगर भागातील बंगल्यासमोर मंगळवारी झालेली गर्दी.
लातूरला संस्थाचालकाची
गोळी झाडून आत्महत्या
-
शिक्षण क्षेत्रात खळबळ; कारणाचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १५ ः येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संजीव सोनवणे (वय ६५) यांनी मंगळवारी (ता. १५) रात्री घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ‘‘माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नका’’, अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या खोली सापडल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली. या घटनेमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शहरातील पद्मानगर भागात प्रा. सोनवणे यांचा ‘चंद्रस्मृती’ नामक बंगला आहे. त्यांचा मुलगा दिग्विजय व मुलगी क्षमा अमेरिकेत असतात. सोनवणे यांच्या पत्नी सुचेता या मुलीच्या प्रसूतीसाठी चार महिन्यांपूर्वी अमेरिकेत गेल्या आहेत. त्यामुळे प्रा. सोनवणे बंगल्यात एकटेच होते. त्यांची बहीण मुंबईहून आज सकाळी त्यांच्या घरी येणार होती. रेल्वे स्थानकातून तिला घेऊन येण्याची सूचना त्यांनी वाहनचालकाला काल रात्रीच देऊन ठेवली होती.
वाहनचालक प्रा. सोनवणेंच्या बहिणीला घेऊन आज सकाळी बंगल्यात आला. दार उघडण्याच्या विनंतीस प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा काढण्यात आला. त्यावेली संजीव सोनवणे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यावेळी त्यांच्या बहिणीने टाहो फोडला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सोनवणे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. दरम्यान, सोनवणेंचे नातेवाईक, मित्रांनी त्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली.
रिव्हॉल्व्हर अन् चिठ्ठी
पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक समाधान चवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेडरूम, घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. बेडरूममध्ये एक रिव्हॉल्व्हर सापडले. परवाना असलेल्या या रिव्हॉल्व्हवरमध्ये तीन गोळ्या होत्या. त्यापैकी एक सोनवणे यांनी स्वतः डोक्यात झाडून घेतली. त्यांच्या बेडरूममध्ये सापडलेल्या चिठ्ठीत ‘माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नका’ असे नमूद आहे. नातेवाइकांना चिठ्ठी दाखवल्यानंतर हस्ताक्षर सोनवणे यांचेच असल्याचे समोर आले. तरीही हस्ताक्षराबाबत आणखी पडताळणी करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अपघातात सोनवणे यांच्या तोंडाला मार लागल्याचे दिसून आले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी दिली.
कारणाचा तपास सुरू
--
लातूर शैक्षणिक क्षेत्रात संजीव सोनवणे यांनी अल्पावधीत आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. त्यांचा मोबाइल तपासला जाणार आहे. कुटुंबीयांकडून माहिती घेऊन कोणाबद्दल तक्रार असेल तर त्या दृष्टीने तपास केला जाणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.