

Santosh Deshmukh Case
sakal
छत्रपती संभाजीनगर - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला होता. अशा व्यक्तीची हत्या होणार असेल तर अन्यायाविरोधात कोण उभे राहील, असा सवाल करीत सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी आरोपी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जाच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला. सरकारी पक्षातर्फे मंगळवारी (ता. सोळा) साडेतीन तास युक्तिवाद केला. न्या. एस.एम. घोडेस्वार यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. आता उर्वरित सुनावणी बुधवारी (ता. १७) होणार आहे.