esakal | सेवाज्येष्ठतेचा प्रश्‍न मार्गी लागल्याचे समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सेवाज्येष्ठतेचा प्रश्‍न मार्गी लागल्याचे समाधान

sakal_logo
By
अतुल पाटील : सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिक्षकी पेशातून प्रशासनात येताना फारशी अडचण वाटली नाही. असे सांगतानाच विद्यापीठातील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवाज्येष्ठतेचा प्रश्‍न मार्गी लागला. यात ५१ जणांची पदोन्नती झाली, याचे समाधान असल्याचे महाराष्ट्रातील पहिल्या महिला पूर्णवेळ कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्या मार्च २०२० पासून कार्यरत आहेत.

१९९३ ला इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात रुजू झाले. सात वर्षे विनाअनुदानित पदावर काम केले. त्यानंतर २००० मध्ये महाविद्यालय अनुदानित झाल्यानंतर वाणिज्य शाखेत असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम सुरु केले. त्यानंतर विद्यापीठातील वाणिज्य विभागात २००८ मध्ये जागा निघाली. अकरा वर्षाच्या सेवेनंतर २०१९ मध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी संधी मिळाली. ही प्रशासनातील कामाची सुरवात ठरली. दरम्यानच्या कालावधीत नॅक, एनआयआरएफ तसेच आरआरसी या विद्यापीठातील सगळ्याच उच्च समित्यांवर काम केले होते.

हेही वाचा: पुणे : कारागृहातून जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराची निघाली रॅली

मार्च २०२० मध्ये कुलसचिवपदाची जबाबदारी आली. शिक्षकी पेशा आणि प्रशासनात काम करणे या गोष्टी स्वतंत्र आहेत. मात्र, परीक्षा नियंत्रक पदाच्या अनुभवासोबत वडील कृषी सहसंचालक आणि सासरे प्राचार्य यामुळे हे पद स्वीकारताना आत्मविश्‍वास होता. त्यामुळे विद्यापीठातील एवढे मोठे पद स्वीकारताना फारसे दडपण वाटले नाही. आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पाडल्या आहेत. तथापि, विद्यापीठाचा स्टाफ मोठा आहे, शिक्षकेतर कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, प्रशासनाला अपेक्षित काम करून घेणे, ही आव्हाने मोठी आहेत. तरीही कौशल्य वापरून जबाबदारी पार पाडत आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठातील प्रवेश रामभरोसे

उपजत कौशल्ये

प्रशासनात काम करताना महत्वाचे बाब लागते ती म्हणजे नियोजन, निर्णय क्षमता आणि व्यवस्थापन. ही कौशल्ये माझ्याकडे आहेत, असे मला कुठेतरी जाणवत होते. त्या उपजत होत्या आणि विकसित झाल्या आहेत, त्यानंतर ठरवले कि, आपण या पदावर काम करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top