
माटेगाव : झिरो फाटा (एरंडेश्वर), ता. पूर्णा येथील हायटेक रेसिडेन्शियल शाळेत एका पालकाचा संस्थाचालकाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ३७) असून ते उखळद (ता. परभणी) येथील रहिवासी व शेतकरी होते.