
छत्रपती संभाजीनगर : दीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी (ता. १६) शाळांमध्ये किलबिलाट सुरू झाला. शहरातील विविध शाळांमध्ये सनई-चौघडा, ढोल-ताशांच्या गजरात औक्षण करून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अनेक शाळांमध्ये मुलांना गुलाबांचे फुल दिले. तो रडला, ती रूसली आणि मग हे दृश्य पाहून अवघी शाळाच खुदकन हसल्याचे दिसून आले!