शास्त्रीय जलनियोजनातून मराठवाडा टँकरमुक्त होऊ शकतो ः खानापूरकर

शास्त्रीय जलनियोजनातून मराठवाडा
टँकरमुक्त होऊ शकतो ः खानापूरकर
Published on: 
फोटो, (ABD26J82646) सुरेश खानापूरकर -- शास्त्रीय जलनियोजनातून मराठवाडा टँकरमुक्त होऊ शकतो ः खानापूरकर छत्रपती संभाजीनगर, ता. २ ः मराठवाड्यासह महाराष्ट्रात कुठेही पाणीटंचाई निर्माण होणार नाही. उपलब्ध पावसाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन केले, तर टँकरमुक्तीबरोबरच बारमाही पिके घेणेही शक्य आहे. मात्र, या क्षेत्रात तांत्रिक ज्ञानाचा अभाव आणि अयोग्य धोरणांमुळे पाणीटंचाई जाणवत आहे, असे प्रतिपादन भूगर्भशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी केले. मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प भानुदास चव्हाण सभागृहात सोमवारी (ता. दोन) गुंफताना ते ‘मराठवाड्याचा दुष्काळ व शिरपूर पॅटर्न’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पांडव होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. खानापूरकर पुढे बोलताना म्हणाले, की सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. लहान धरणे आताच कोरडी पडू लागली आहेत, तर जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन सुरू आहे. आगामी मे महिन्यापर्यंत अनेक जलसाठे आटण्याची शक्यता आहे. आज पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, भविष्यात टँकर भरण्यासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध राहील का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सुमारे ७०० मिलिमीटर पाऊस पडूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही, ही आपल्या जलव्यवस्थापनातील मोठी विसंगती आहे. काही भागांत अतिवृष्टीमुळे धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागते, तर दुसरीकडे काही महिन्यांतच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात रमेश पांडव यांनी विचार मांडले. प्रास्ताविकात नरहरी शिवपुरे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाची पार्श्वभूमी, त्यावरील उपाययोजना आणि या विषयातील मराठवाडा युवक विकास मंडळाच्या योगदानाची माहिती दिली. स्व. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खनाळे यांनी केले, तर सचिन रुद्रे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.